Breaking news

Lonavala News : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी सोमनाथ गायकवाड तर उपाध्यक्ष पदी सनी पाळेकर यांची नियुक्ती

लोणावळा : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी भांगरवाडी येथील सोमनाथ गायकवाड यांची तर उपाध्यक्ष पदी वलवण गावातील सनी उर्फ भुषण पाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे व युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी त्यांना नियुक्तीपत्रे दिली. यापुर्वी देखील गायकवाड यांनी लोणावळा शहर कार्याध्यक्ष तसेच मावळ तालुका उपाध्यक्ष पद भुषविले होते. तर पाळेकर यांनी लोणावळा शहर युवक अध्यक्ष पद भुषवत युवकांचे मोठे संघटन केले आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला जाईल असे गायकवाड व पाळेकर यांनी सांगितले.

इतर बातम्या