Breaking news

लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवकार्य पुरस्कार प्रदान

लोणावळा : लोणावळ्यात शिवदुर्ग मित्र या संस्थेच्या शोध व बचाव तसेच साहसी कार्याची दखल घेऊन वसंत मोरे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने त्यांना पहिला शिवकार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

    मुंबईमधील श्री वसंत मोरे प्रतिष्ठान ने यावर्षी पासूनच हा पुरस्कार सुरू केला आहे.  यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यात या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती मागवली होती शिवजयंती निमित्ताने दिला जाणारा पहिलाच पुरस्कार शिवदुर्ग मित्र ला मिळाला ही लोणावळाकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी निवड समिती म्हणून महाराष्ट्र अँडव्हेंचर कौन्सिल या संस्थेने काम पाहिले.

      या पुरस्कार वितरण सोहळ्यास वसंत मोरे प्रतिष्ठानच्या हर्षलाताई आशिष मोरे, आशिष वसंत मोरे, जावेद शेख, युवासेनेचे रोहित खैरे, रोहित काळे, जॉन सांगळे, दूरदर्शन चे निवेदक कुणाल रेगे, राजेश गाडगीळ,  फडके काका उपस्थित होते. तर शिवदुर्ग च्या वतीने सचिव सुनील गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू व गणेश गिध यांनी हा पुरस्कार स्विकारला.

इतर बातम्या