Breaking news

Lonavala News : संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत 8 नशेखोरांवर कारवाई; न्यायालयाने ठोठावला दंड

लोणावळा : संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी गांजा या मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 7 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

      पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल व  सहायक पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या "संकल्प नशामुक्ती" या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाईकरण्यातआली. 'गांजा' या मादक पदार्थाचे सेवन करीत असताना मिळून आलेल्या 8 नशेखोरांवर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. 1985 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले असून यापुढे कोणी नशेखोर दिसून आल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर यांच्या सुचना नुसार पोलीस हवालदार जयराज पाटणकर, पोलीस नाईक हनुमंत शिंदे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई पाटिल यांनी केली तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक सुधीर डुंबरे यांनी कामकाज पाहिले.

इतर बातम्या