गुढीपाडवा । सह्याद्री व मी प्रतिष्ठानने तिकोणा किल्ल्यावर उभारली गुढी

लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्यावर आज गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षांच्या निमित्त मावळातील सह्याद्री व मी प्रतिष्ठान च्या वतीने गुढी उभारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गड किल्ल्यांची निर्मिती करत स्वराज्याचे तोरण बांधले होते. गुढीपाडवा या दिवशी समस्त हिंदू घरासमोर गुढी उभारत हिंदू नववर्ष दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. त्याच प्रमाणे आपले स्फूर्तिस्थान असलेल्या किल्ल्यावर गुढी उभारण्याचा संकल्प करत मावळातील सह्याद्री प्रतिष्ठान व मी प्रतिष्ठान यांच्या 40 कार्यकर्त्यांनी आज सकाळी नऊ वाजता पवन मावळातील तिकोणा किल्ल्यावर जाऊन गुढी उभारत हिंदू नववर्षांचे स्वागत केले.