Breaking news

रोटरी क्लब लोणावळा; डाॅक्टर्स दिनानिमित्त लोणावळ्यात वैद्यकीय तपासणी शिबिर

लोणावळा : डाॅक्टर्स दिनानिमित्त रोटरी क्लब लोणावळा यांच्या वतीने वैद्यकीय शिबिर घेत व डाॅक्टर मंडळींचा सन्मान करत हा दिवस साजरा करण्यात आला. 1 जुलै 2022 पासून रोटरी नवीन वर्ष 2022-23 सुरु झाले. या निमित्ताने व डाॅक्टर्स दिनाचे औचित्य साधत सदरचा उपक्रम लोणावळा नगरपरिषदेच्या भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राबविण्यात आला. 

    याप्रसंगी रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष रो आशिष मेहता, सचिव रो पुंडलिक वानखेडे, खजिनदार रो गोरख चौधरी, माजी अध्यक्ष रो जयवंत नलोदे, उपाध्यक्ष रो दिलीप पवार, रो नितीन कल्याण, रो नारायण शारवाले, रो मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, रो फातिमा कॉन्ट्रॅक्टर, रो रवि कुलकर्णी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख रो डॉक्टर डॉली आगरवाल यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रसंगी मुख्यध्यपिका नीता पवार यांनी सर्वाचे स्वागत केले. क्लब कडून शाळकरी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. रो अध्यक्ष आशिष मेहता यांनी शाळेला येत्या शैक्षणिक वर्षां मध्ये अजून मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेतील शिक्षक वर्गाने उपक्रमाला सहकार्य केले. याप्रसंगी डाॅ. पाटील, डाॅ. ममता काळे, डाॅ. राजेश गवळी, डाॅ. भालेराव, डाॅ. शैलेश ओसवाल आदींना सन्मानित करण्यात आले.

इतर बातम्या