Lonavala Industrial Estate l लोणावळा औद्योगिक वसाहतीतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पोलिस निरीक्षकांची भेट

लोणावळा : लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. येथे आज 28 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुहास जगताप यांनी भेट देऊन उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीदरम्यान वसाहतीतील सुरक्षाविषयक प्रश्नांवर चर्चा झाली. उद्योजकांच्या मागणीनुसार पोलिस निरीक्षक श्री. जगताप यांनी वसाहतीत रात्रीच्या वेळी नियमित पेट्रोलिंग करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप संभाजी कोराड आणि उपाध्यक्षा श्रीमती शितल अनिल पतंगे यांनी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बैठकीला संस्थेच्या संचालिका मोनिका गावडे, संचालक आशिष शहा, निलेश वर्तक, अनिकेत जांभेकर, देवराम लोखंडे, वसंत शिर्के तसेच अनेक कारखानदार सभासद उपस्थित होते. सभेच्या शेवटी संस्थेच्या संचालिका मोनिका गावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.