Breaking news

कै. मधुकर नाना खांडेभरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान

लोणावळा : वरसोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजू मधुकर खांडेभरड यांचे वडील कै. मधुकर नाना खांडेभरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त खांडेभरड परिवाराकडून समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला. सोबतच हभप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या सुश्राव्य अशा कीर्तन सेवेचे आयोजन ग्रामस्थांसाठी करण्यात आले होते. 15 मार्च रोजी वरसोली गावात हा कार्यक्रम पार पडला. खांडेभरड परिवाराकडून या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.

     समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करत मनाची शांती व एकाग्रता यावर काम करणाऱ्या मनशक्ती या केंद्राचे प्रमुख प्रमोद भाई शिंदे, लोणावळा, मावळ तालुका व संपूर्ण राज्यभरामध्ये जेथे मदतीची गरज भासेल अशा ठिकाणी जाऊन रेस्क्यू काम करणारी लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्था व या संस्थेचे सचिव सुनील गायकवाड, वाकसई गावातील सुपुत्र व सेवानिवृत्त सुभेदार कैलास येवले, वरसोली गावातील जिवलग मित्र बारकू मामा बोडके, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड व बुवांची मिसळ यांच्या माध्यमातून समाजात मोफत रुग्णवाहिका सेवा देणारे अनिल गायकवाड, निष्ठावंत वारकरी हभप सिताराम महाराज तनपुरे, ग्रामीण भागातील मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करून घेणे व त्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक अनुदान मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य करणारे श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला या शाळेचे शिक्षक उमेश किसन इंगुळकर या मान्यवरांचा खांडेभराड परिवाराकडून कैलासवासी मधुकर नाना खांडेभराड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वरसोली व आजुबाजुच्या गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी किर्तनसेवेतून मनुष्य जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. समस्त खांडेभरड परिवाराकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या