Breaking news

पवना बंद जलवाहिनी रद्द झालीच पाहिजे - पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं - शिवसेना उबाठा

पवनानगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज पवनानगर बाजारपेठेमध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. पवना बंद जलवाहिनी रद्द झालीच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत आज पवनानगर बाजारपेठेत हा शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला होता.

     राज्य शासनाने पवना बंदिस्त जलवाहिनी वरील स्थगिती उठवत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडून त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलन घेण्याच्या नैतिक अधिकार नाही. त्यांनी आधी राजीनामे देऊन शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर यायला हवे. शासनाने तात्काळ स्थगिती उठविल्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. मावळचे आमदार व माजी आमदार यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे एकीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी मावळात आंदोलन करत असून पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचेच नेते आनंद उत्सव साजरा करत असल्याचा घनाघात तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी केला. पवना बंदिस्त जलवाहिनी झाल्यास मावळातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या भीतीने संतप्त झाला आहे. मागील 2011 साली झालेल्या आंदोलनात तीन जणांचा बळी गेला होता, अजून किती शेतकऱ्यांचे बळी शासन घेणार असा संतप्त प्रश्न या आक्रोश मोर्चा दरम्यान शेतकरी विचारत होते.

इतर बातम्या