Breaking news

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा शहरांमध्ये तिरंगा रॅली

लोणावळा : विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणावळा प्रखंड वतीने स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित केली होती. हातामध्ये तिरंगा ध्वज घेत भारत मातेच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वतंत्रवीर सावरकर पुतळा चौक भांगरवाडी दरम्यान ही रॅली काढण्यात आली होती. यामध्ये सर्व बजरंगी हातात तिरंगा ध्वज गीत वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत होते. या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. 

      स्वतंत्र भारताचा 80 वा स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा व तिरंगा रॅली बाबत भारतवासीयांना आव्हान केले होते. त्यानुसार लोणावळा शहरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने ही रॅली पार पडली. यामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. स्वतंत्र वीर सावरकर पुतळा चौक या ठिकाणी वंदे मातरम या गीताने सदर तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.

इतर बातम्या

15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी