Breaking news

स्वतंत्र दिनाच्या निमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने देशभक्तीपर लेझर शोचे आयोजन

लोणावळा : भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्त लोणावळा नगर परिषदेच्या वतीने स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये तसेच स्वतंत्र दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये देशभक्तीपर लेझर शोचे आयोजन लोणावळा शहरामध्ये करण्यात आली आहे. लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर हा लेजर शो दाखविला जाणार असल्याची माहिती लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी दिली.

       भारताचा 80 वा स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत लोणावळा नगर परिषदेच्या वतीने यावर्षी प्रथमच शहरांमध्ये लेझर शो आयोजित केला आहे. या शोच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हुतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच देशभक्तीपर विविध गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. लोणावळा शहरामध्ये प्रथमच एक वेगळा प्रयोग यानिमित्त होत असून नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा व दोन्ही दिवस या शोचा आनंद घ्यावा असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 

      15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर लोणावळा नगर परिषदेच्या वतीने आणीबाणीच्या काळामध्ये बंदिवास सहन केलेल्या नागरिकांचा सन्मान. माजी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच लोणावळा शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचा सन्मान. लोणावळा नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमचा सन्मान व लोणावळा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना सेफ्टी किटचे वाटप केले जाणार आहे. 

     या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, राष्ट्रवादीचे गटनेते मंगेश मावकर, आरोग्य सभापती धनंजय काळोखे, मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापती नयना पैलकर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल गवळी, शिक्षण समितीच्या सभापती दीपा मंगेश अगरवाल, बांधकाम समितीचे सभापती सनी दळवी, नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेवक मुकेश परमार, नगरसेवक सनी घोणे हे उपस्थित होते.

इतर बातम्या

15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी