Breaking news

MTPL T20 : मावळच्या मैदानात रंगणार मावळ तालुका प्रिमियर लीगचा थरार; 6 संघांमध्ये होणार सामने

लोणावळा : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व मावळ तालुक्यात प्रथमच आयपीएल दर्जाच्या मैदानावर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळविल्या जाणार्‍या मावळ तालुका प्रिमियर लिग (MTPL) सामन्यांची जय्यत तयारी मुंढावरे येथील एसपीजे मैदानावर सुरु आहे. तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी सदर स्पर्धेला हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक व केटी स्पोर्ट चे सागर चौधरी यांनी केले आहे. 29 व 30 मे रोजी हे सामने होणार आहेत.

  वभसदर स्पर्धेचे प्रायोजकत्व रणजित भाऊ काकडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत असून प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना चौधरी यांनी सांगीतले की, या स्पर्धेत राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह स्थानिक खेळाडू सहभाग घेणार असून एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.

संघ, संघमालक आणि कर्णधार यांची नावे पुढील प्रमाणे:

1) नमो युनायटेड - संघमालक : दिपक मोडगील, कर्णधार -  दिपक मोडगील

2) परेश बडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन -  परेश बडेकर - कर्णधार अमित सोनवणे

3) एस के अकॅडमी - राहुल राठोड - कर्णधार - महेश पिंगळे

4) ए जी किंग्ज - अनिकेत गायकवाड, कर्णधार - संजय मोरे.

5) दोस्ती एलेवन - हर्षद दौंडे व संकेत सोनवणे - कर्णधार गणेश वायकर.

6) कोराई टस्कर्स - सागर चौधरी - सागर चौधरी.

    सदर स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून मावळ माझा न्युज, आपला मावळ न्यूज, आवाज न्युज, शाल्लोंम प्रोडक्शन आदी काम पहात आहेत.

इतर बातम्या