Breaking news

गणेशोत्सव काळात अवैध दारू विक्री करणारे व पत्त्यांची जुगार खेळणार्‍या व्यक्तींवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची कारवाई

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव काळामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून अवैध धंदे व जुगारीबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून मौजे औढे, बोरज, चावसर गावांच्या हद्दीमध्ये अवैध दारु विक्री तसेच पाटण गावाच्या हद्दीमध्ये पत्त्यांचा जुगार यावर पोलिसांकडून छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये एकूण 17 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

     पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली औंढे गावातील नंदु शिवराम पाठारे (वय 47), संतोष चिंधू शिळावणे (वय 49), बोरज गावातील नंदु शिवराम पाठारे (वय 47) आणि चावसार या गावातील अंजना बाबु पवार (वय 40) यांच्यावर छापे टाकून सदर चौघांकडून एकूण 4390 रुपयांची देशी, विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला.

     याशिवाय मौजे पाटण ता. मावळ गावाच्या हद्दीमध्ये अवैध जुगार अडयावर छापा टाकून संताष श्रीकांत येवले (वय 40), नवनाथ हरीभाऊ जाधव (वय 35), सुनिल झपा तिकोणे (वय 45), राजु रामचंद्र पटेकर (वय 43), अरुण रामचंद्र तिकोणे (वय 40), शंकर चंदु तिकोणे (वय 30), सत्यवान छगन तिकोणे (वय 35), सागर भाऊ तिकोणे (वय 35), अक्षय गुलाब तिकोणे (वय 24), अक्षय ज्ञानेश्वर दाभाडे (वय 23), सदाशिव उर्फ पंकज राजाराम तिकोणे (वय 35), चंदु तिकोणे (वय 50, सर्व राहणार पाटण) व सुधिर उर्फ गोकुळ किसन हुलावळे (वय 45, राहणार कार्ला) यांचेवर छापा टाकून संबंधित 13 जणांकडून रोख 26 हजार 500 रुपये व दोन कार असा एकुण 9 लाख 56 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

   पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि पोलीस उप अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सचिन बनकर, सिताराम बोकड, विजय गाले, संतोष शेळके, गणेश होळकर, अमित ठोसर, पुष्पा घुगे, नितीन कदम, रहिस मुलाणी, मच्छिंद्र पानसरे, ऋषिकेश पंचरास यांनी ही कारवाई केली.

इतर बातम्या