लोणावळा शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, उपसंपर्क प्रमुख गणेश जाधव, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, मावळ तालुका प्रमुख राजु खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, उपतालुका प्रमुख गबळू ठोंबरे, युवासेना पुणे जिल्हा पदाधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी शाम सुतार, दत्ता केदारी, महिला संघटिका कल्पना आखाडे, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, सिंधू परदेशी, महिला उपसंघटक मनिषा भांगरे, उपसंघटक प्रकाश पाठारे, संजय भोईर, मनेष पवार, जयवंत दळवी, भगवान देशमुख, सुनिल येवले, पंकज खोले, विशाल गावडसे, परेश बडेकर, श्रीकांत कंधारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा मनोदया यानिमित्त शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी व्यक्त केला आहे.