Breaking news

Lonavala News : लोणावळा ग्रामीण पोलिसांचा गावठी हातभट्टीवर छापा; 1 लाख 20 हजारांचा माल केला नष्ट

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहरगाव येथील कंजारभट वस्ती जवळील एका बेकायदेशीर गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले.

     लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेहेरगावच्या हददीत देवकरवस्ती, कंजारभट वस्ती येथील माळरानात ओढयाचे कडेला प्राथनाबेन मेघनाथ राजपुत (वय 34, रा. वेहेरगाव, कंजारभट वस्ती, ता. मावळ) हिच्या मार्फत बेकायदेशीर रित्या गावठी दारू बनविणारी हातभट्टी चालवली जात होती. पोलिसांना याची खबर लागताच पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पो.हवा. बोकड, गाले, पो.ना. होळकर, पवार, पो.कॉ. तळपे, खैरे, कामथणकर, पंडित, होमगार्ड शिर्के यांच्या दलाने घटनास्थळी छापा टाकला. 

     घटनास्थळी पोलिसांना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 200 लिटर मापाच्या 12 प्लॅस्टीक ड्रममध्ये 1,20,000 रुपये किमतीचे 2400 लिटर कच्चे रसायन आढळून आले. सदरचे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केलं. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. पवार हे करीत आहे.

इतर बातम्या