Lonavala News : कोथुर्णे निर्भयाच्या आरोपीला फाशी द्या - भाजपा अल्पसंख्याक आघाडी

लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार करत तीची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मावळ भाजपा अल्पसंख्याक आघाडी च्या वतीने लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. नराधार आरोपी व त्याला मदत करणारी त्याची आई या दोघांना फाशीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मावळ भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शौकत शेख, मावळ तालुका चित्रपट आघाडी अध्यक्ष सागर बेळूरे, साजिद बेपरी, शाहरुख शेख, मन्सूर शेख, रिझवान खान, नाबिल शेख, सचिन शिंदे, गुद्दा मथरे, इम्रान शेख, आशिष गुप्ता, किरण समोसे आदी उपस्थित होते.