Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 11 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 77 मिमी पावसाची नोंद
लोणावळा : लोणावळा शहरात 11 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 77 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी शहरांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. हलक्या स्वरूपात दिवसभर पाऊस पडत होता. तर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. मुंबई वेधशाळेने दिलेल्या इशाराप्रमाणे 11, 12 व 13 ऑगस्ट रोजी पुणे घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 4769 मिमी (187.76 इंच) एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी मात्र आज अखेरपर्यंत 3952 मिमी (155.59 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 32.17 इंच अधिकचा पाऊस झाला आहे.



















