Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 22 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 35 मिमी पावसाची नोंद
लोणावळा : मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी लोणावळा शहरामध्ये चांगलाच जोर धरला आहे. 22 ऑगस्ट रोजी 24 तासात शहरात 35 मिमी (1.38 इंच) पावसाची नोंद झाली. दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.
लोणावळा शहरामध्ये जून महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. पुढे जुलै व ऑगस्ट महिन्याचे काही दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे लोणावळा शहर व परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर शहरात कमी झाला होता अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता शनिवारी मात्र पावसाच्या जोरदार सरी शहरामध्ये कोसळल्या. शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 5055 मिमी (199.02 इंच) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर पर्यंत शहरात 5023 मिमी (197.76 इंच) पाऊस झाला होता.

















