Breaking news

लोणावळा शहर भाजपचा महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा; पक्षाचा आदेश पाळणार - महायुतीचा धर्म पाळणार

लोणावळा : लोणावळा शहर भाजपाच्या वतीने आज मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. लोणावळा शहर भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली. यापुढील काळात महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस रात्र एक करत आमदार सुनील शेळके यांना लोणावळ्यातून बहुमत मिळवून देऊ असे लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड यांनी सांगितले.

      यावेळी व्यासपीठावर भाजपा गटनेते देविदास कडू, ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, दादा धुमाळ, राजू चव्हाण, माजी नगरसेविका मंदा सोनवणे, जयश्री आहेर, आशाताई खिल्लारे, प्रथमेश पाळेकर, अविनाश पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना अरुण लाड म्हणाले, राज्यामध्ये आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मावळ विधानसभेत महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांचे काम करणार असल्याचे सांगितले. लोणावळ्यातील सर्व भाजपा ही महायुतीचा धर्म पाळत काम करेल व आमदार सुनील शेळके यांना मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

इतर बातम्या