Lonavala Rain Information l लोणावळ्यात रविवारी पावसाचा कहर; 24 तासात 233 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात रविवारी पावसाने अक्षरशः कहर केला. 24 तासात तब्बल 232 मिमी (9.17 इंच) पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पावसाने शहरात थैमान घातले. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गवळीवाडा भागात काही घरांमध्ये पाणी देखील घुसले. राज्यात यावर्षी मान्सून मे महिन्यात दाखल झाला आहे. तसेच समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व मौसमी पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरु आहे. त्याचा देखील परिणाम जोरदार पावसावर झाला आहे.
लोणावळ्यात मान्सून सुरू होण्यापूर्वी 410 मिमी (16.14 इंच) पाऊस झाला आहे.