Breaking news

लोणावळा महाविद्यालयातील प्रा. डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या 'केमिकल वेस्ट डिस्पोजल यंत्रा'ला भारतीय पेटंट मंजूर


लोणावळा : येथील लोणावळा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या नावावर एका अभिनव संशोधनाचा ठसा उमटला आहे. त्यांनी विकसित केलेल्या "केमिकल वेस्ट डिस्पोजल यंत्रा"ला भारतीय पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट मंजूर झाले आहे.

       या यंत्राच्या सहाय्याने रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळांमध्ये तसेच केमिकल उद्योगांमध्ये निर्माण होणारा घातक रासायनिक कचरा अधिक सुरक्षित, सोपा आणि खर्चिक दृष्टिकोनातून प्रभावी पद्धतीने हाताळता येणार आहे. सध्याच्या प्रक्रियांमध्ये वेळखाऊ आणि खर्चिक पद्धतींचा अवलंब करावा लागतो, त्यामुळे अनेक संशोधकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर डॉ. नागटिळक आणि त्यांच्या संशोधन गटाने कमी खर्चात कार्यक्षमतेने कार्य करणारे यंत्र डिझाईन करून एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या पेटंटनंतर संबंधित यंत्राचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक वापर अपेक्षित आहे. परिणामी, वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होऊन पर्यावरणपूरक प्रक्रियांना चालना मिळेल, असे मत संशोधन गटाने व्यक्त केले. 

     या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. नागटिळक यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव अ‍ॅड. नीलिमा खिरे, खजिनदार दत्तात्रय येवले व ट्रस्टचे सर्व विश्वस्त, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप सोनटक्के, सहकारी प्रा. संदीप लबडे आणि इतर सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या