Breaking news

MTPL T20 : मावळ तालुका प्रिमियर लिग चषकाला KT स्पोर्टस ची गवसणी; 5 गडी राखून मिळविला विजय

लोणावळा : मावळ तालुक्यात IPL च्या धर्तीवर पार पडलेल्या मावळ तालुका प्रिमियर लिग स्पर्धेत लोणावळ्यातील KT स्पोर्ट्स संघाने विजयाला गवसणी घातली. 5 गडी राखत KT संघाने हा सामना जिंकत चषक पटकावला.

    29 व 30 मे रोजी मुंढावरे गावातील SPJ ग्राऊंडवर MTPL चे सामने खेळविले गेले. सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील अंतिम सामना हा KT स्पोर्ट्स विरुद्ध SK स्पोर्ट्स यांच्यात पार पडला. KT स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतली. SK संघाने प्रथम फलंदाजी करताना 86 धावाचे उद्दिष्ट KT संघासमोर ठेवले होते. ते उद्दिष्ट गाठताना KT संघाने पाच गडी राखत 13.2 षटकात सामना खिशात घातला. या मालिकेत प्रेम रजपूत याला उत्कृष्ट गोलंदाज, दत्ता पवार यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तर अंडर 19 चा आंतरराष्ट्रीय खेळाडू विकी ओसत्वाल याला मॅन ऑफ द सिरिज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अतिशय सुंदर पद्घतीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यात IPL च्या धर्तीवर हे सामने झाले. यामध्ये अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ मावळवासीयांना जवळून पाहता आला. KT स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून व रणजितभाऊ काकडे स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सामने पार पडले.

इतर बातम्या