नेसावे गावात आरोग्य मार्गदर्शन व दंत तपासणी शिबिर संपन्न

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती व कु. कार्तिक उर्फ शंभू नवनाथ शिरसाट याच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील नेसावे या गावांमध्ये आरोग्य मार्गदर्शन व दंत तपासणी शिबिराचे आयोजन 21 मार्च रोजी करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये तज्ञ डाॅ. सोमेश माने, डाॅ. रोहीत जाधव, डाॅ.व्यंकटेश नंदनकर(स्माईल प्लिज डेंन्टल क्लिनिक, कामशेत) यांनी नागरिकांची तपासणी करत त्यांना आरोग्य मार्गदर्शन केले. नेसावे शाळेतील विध्यार्थी व गावातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेतला. वाढदिवसानिमीत्त आयोजित शिबीरामध्ये शाळेतील मुलांना व नागरीकांना दातांची काळजी कशी घ्यावी व मार्गदर्शन करण्यात आले. दातांची काळजी घेण्यासाठी मुलांना दातांचा ब्रश व पेस्ट देण्यात आली. तसेच सर्व मुलांना व नागरीकांना वाढदिवसानिमीत्त खाऊचे वाटप करण्यात आले.
गावचे पोलीस पाटील अंकुश नामदेव शिरसट, नवनाथ नामदेव शिरसट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास शाळेचे मुख्यध्यापक त्र्यंबक आहेर, सहशिक्षिका प्राजक्ता जाधव, रुपाली हरीहर, अंगणवाडी ताई अनिता कुटे व गावातील महीला, पुरुष उपस्थित होते. समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या सदभावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.