Maval News l ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सव कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

वडगाव मावळ : ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सुधीर सुरेश ढोरे, तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब धोडिबा तुमकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यक्रम प्रमुख म्हणून अतुल प्रकाश ढोरे आणि विशाल नंदकुमार म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.
ही निवड पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गणेशआप्पा ढोरे, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, सुभाष भास्करराव म्हाळसकर, जाधव, तुकाराम ढोरे, तुकाराम काटे, अशोक ढमाले, सुनिता कुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष: सुधीर सुरेश ढोरे
- कार्याध्यक्ष: बाळासाहेब धोडिबा तुमकर
- कार्यक्रम प्रमुख: अतुल प्रकाश ढोरे, विशाल नंदकुमार म्हाळसकर
- उपाध्यक्ष: सोमनाथ नामदेव धोंगडे, प्रशांत बाळासाहेब भिलारे, अनिल भागुजी ओव्हाळ
- सचिव: तुषार वसंत वहिले
- सहसचिव: विनोद बाळासाहेब ढोरे
- खजिनदार: अनिल बबन कोद्रे
- सहखजिनदार: शेखर खंडूजी वहिले
संघटक:
समिर राजेंद्र दंडेल, सुर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यु कुडे, निखिल वहिले, स्वपनील च. ढोरे, अभिजीत ना. ढोरे, अमोल का. ढोरे, पप्पु द. ढोरे
कार्यकारिणी सदस्य:
गणेश अर्जुन ढोरे, संजय सजन दंडेल, राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, रमेश नारायण ढोरे, भाऊसाहेब तुकाराम ढोरे, संदीप वहिले, शिवाजी वसंतराव येळवंडे, सतीश गाडे, भुषण मुथा, अतुल चंद्रकांत राऊत, सुहास विनोदे, सनी बेल्हेकर, विनायक लवंगारे, योगेश वाघवले.
ही कार्यकारिणी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्ण समर्पणाने कार्य करेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.