कौतुकास्पद l आढे गावातील गायत्री कारके हिचे जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत यश

मावळ माझा न्युज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आढे येथील विद्यार्थिनी गायत्री गणपत कारके हिने खुल्या प्रवर्गातून जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप पुणे येथे निवड झाली. आढे शाळेतील इयत्ता पाचवीच्या सतरा विद्यार्थी पैकी अकरा विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. ते सर्वजण पास होऊन त्यापैकी गायत्री गणपत कारके हिची नवोदय साठी निवड झाली आहे. तिला मार्गदर्शन करणारे तिचे वर्गशिक्षक अमित सारडा व गायत्री कारके हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.