Breaking news

Lonavala : साईबाबा पालखी सेवा मंडळाचे भक्त गणेश चाळके यांचे निधन

लोणावळा : येथील साईबाबा पालखी सेवा मंडळाचे भक्त व सदा हसतमुख असणारे गणेश चालके यांचे काल अपघाती निधन झाले. डोंगरगाव वाडी येथे राहणारा गणेश चाळके हा अगदी शालेय जीवनापासून सर्व मित्रांचे लाडका व आवडता होता. मित्रांमध्ये समरस होऊन काम करणारा गणेश मागील 25 वर्षापासून साईबाबा पालखी सोबत वारी करायचा. लोणावळ्यातील अनेक तरुणांना त्याने बाबाच्या सेवेत घेतले होते. लोणावळा शहरातून जाणारी मानाची पहिली पालखी व पालखी मधील बाबांच्या पादुकांची लोणावळ्यात मिरवणूक निघत असताना गणेश सेवेकरी म्हणून कायम पुढे असायचा. वरसोली टोलनाका येथे त्याचे बराच काळ काम केले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. काल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साईबाबा पालखी सेवा मंडळाचे सदस्य, गणेश सोबत शाळेत असणारे त्यांचे मित्र, ग्रामस्त व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इतर बातम्या