डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात लायन्स क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या वतीने लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय येथे 11 सप्टेंबर रोजी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या सुरुवातीला लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य ही आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आपण कितीही हुशार असलो किंवा कितीही मोठे ध्येय ठेवले, तरी आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण ते ध्येय पूर्ण करू शकतो, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ६१४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमास लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष लायन मंगेश कदम, सचिव लायन राजेश राजपूत, खजिनदार लायन रोहित थोरात, लायन ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड, लायन ॲडव्होकेट राजू शिंदे, लायन हेमाक्षणी राजपूत, लायन स्नेहलता माळी, लायन अश्विनी कदम, लायन निराळी नाळेकर, लायन विरल गाला, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन डॉ. लीना पौन, लायन डॉ. कृतुजा तांडेल गोजे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रणपिसे सर आणि सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
डॉ ऋतुजा तांडेल गोजे प्रभारी वैद्यकीय अधिकारी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र तुंगार्ली, डॉ विक्रम वाडेकर वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र भांगरवाडी डॉ रश्मी पुरी वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्याचे काम लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या वतीने करण्यात आले आहे.




















