Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात पुन्हा पावसाला सुरुवात; मागील 24 तासात 42 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : मागील चार पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेले पावसाला लोणावळा शहरात पुन्हा सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री ते रविवारची पहाट दरम्यान तब्बल 42 मिमी (1.65 इंच) पावसाची नोंद लोणावळा शहरात झाली आहे. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 5403 मिमी (212.72 इंच) एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 5664 मिमी (222.99 इंच) पाऊस झाला होता. हवामान विभागाने सप्टेंबर महिना कोरडा जाणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र पुन्हा अल निनो चा प्रभाव दिसू लागल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. घाट माथ्यावर तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आता नव्याने व्यक्त करण्यात आला आहे

.

इतर बातम्या