Breaking news

Lonavala News l भारतीय जनता पक्ष वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहरातील भाजपा माजी शहर अध्यक्षांचा सन्मान

लोणावळा : भारतीय जनता पक्ष वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहर भाजपाच्या वतीने लोणावळा शहरातील भाजपाच्या माजी अध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.

       लोणावळा शहर भाजपाचे माजी शहराध्यक्ष दादा धुमाळ, बाबा शेट्टी, राजाभाऊ खळदकर, रामविलास खंडेलवाल, संजय गायकवाड, सुभाष बापू सोनवणे, राजेंद्र चौहान, बाळासाहेब जाधव या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. 

     याविषयी बोलताना शहराध्यक्ष अरुण लाड म्हणाले लोणावळा शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंतच्या माजी अध्यक्षांनी भरीव असे काम केले आहे. आज देशामध्ये व राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही भाजपाचे आहेत या यशामध्ये निश्चितच लोणावळा असतील भाजपा कार्यकर्ते व माजी अध्यक्ष यांचा देखील मोलाचा वाटा आहे. याचीच आठवण म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहरातील भाजपाच्या माजी अध्यक्षांचा पक्षाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.

इतर बातम्या