Breaking news

Expressway Accident : सिमेंटची वाहतूक करणार्‍या ट्रकला तांदूळ वाहतूक करणार्‍या ट्रकची धडक; चालक व क्लिनर आडकले केबिनमध्ये

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी 40 जवळ आज सकाळी दोन ट्रकचा विचित्र अपघात झाला. यामध्ये सिमेंटची पोती घेऊन जाणार्‍या ट्रकला तांदूळ वाहतूक करणार्‍या ट्रकची मागून जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये तांदूळ वाहतूक करण्यात ट्रकच्या केबिनमध्ये चालक व क्लिनर आडकले होते. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि ॲफकोन कंपनीचा यंत्रणांनी जखमींना बाहेर काढण्यात खूप योग्य भूमिका बजावली. बोरघाट पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ताबडतोब या घटनेची तीव्रता कमी करून वाहतूक सुरळीत केली.

इतर बातम्या