Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा; अभियांत्रिकी, नवोपक्रम आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा गौरव

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथे अभियंता दिन २०२६ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.    

      अभियंत्यांची सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य, नवोपक्रमशीलता तसेच शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत मेकॅनिकल सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास STES, चे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड आणि लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. आर. पी. लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच SIT लोणावळ्याचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, CCC प्रमुख प्रा. योगिनी राऊत, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या वतीने शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक व विभागांचा गौरव करण्यात आला. संस्थेने उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत Best Achievement Awards, Best Teacher Award आणि Best Department Award प्रदान करून गुणवंतांचा सन्मान केला.

नव्याने Ph.D. प्राप्त करणाऱ्या प्राध्यापकांचा विशेष गौरव

अभियांत्रिकी व शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने Ph.D. पदवी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला. उच्च शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या प्राध्यापकांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या या शैक्षणिक प्रगतीमुळे संस्थेच्या संशोधन संस्कृतीला आणि शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितच चालना मिळत आहे.

      सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२५-२६ – सौ. शीतल पाटील (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील) यावर्षीचा Best Teacher Award सौ. शीतल पाटील यांना प्रदान करण्यात आला. अध्यापनातील सातत्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी, शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट विभाग पुरस्कार – इलेक्ट्रिकल विभाग

Best Department Award यावर्षी Electrical Engineering Department ला प्रदान करण्यात आला. विभागाने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, तांत्रिक उपक्रम, नवोपक्रम आणि विविध शैक्षणिक क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्राप्त केला.

       या पुरस्कारांमुळे प्राध्यापक, सहाय्यक कर्मचारी आणि विभागांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, संस्थेमध्ये गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि उत्कृष्टतेची संस्कृती अधिक दृढ करण्यास मदत झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान अभियंता दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना “Engineering is not just about building things, it is about building the future” हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच संशोधन, नवोपक्रम, सर्जनशील विचार आणि सामाजिक बांधिलकी यांना महत्त्व देण्याचे आवाहन करण्यात आले.

       Career Counselling Center (CCC) आणि Mechanical Engineering Students Association (MESA) यांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अभियंता दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेला गुणवंतांचा सन्मान हा संस्थेतील शैक्षणिक उत्कृष्टता आणि उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

इतर बातम्या