Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्ग संवर्धन कार्यशाळा संपन्न

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय दुर्ग संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  

     या कार्यशाळेत पुणे विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमधील 92 NSS स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे, प्रा.सुलक्षणा पाटील, प्रा. सतीश मेंडके, प्रा.मयूर राऊत, प्रा.सुहास डाफळ, सहदेव जाधव, संजय माळी आणि नंदकिशोर खैरनार यांनी देखील सक्रीय सहभाग नोंदवला.  

     स्वयंसेवकांनी दुर्ग संवर्धन जनजागृतीसाठी पथनाट्य (स्ट्रीट प्ले) सादर करून स्थानिक नागरिकांमध्ये गडकोटांचे महत्त्व पटवून दिले. तसेच गडाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून दुर्ग संवर्धनासाठी आपला हातभार लावला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सतीश साठे यांनी दुर्गसंवर्धनाचे महत्त्व विषद केले आणि उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच, पुरातत्व विभाग आणि लोहगड ग्रामपंचायत यांनी या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे श्री. मंडावरे आणि लोहगडच्या सरपंच सोनाली बैकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  

      या कार्यशाळेमुळे युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागृती निर्माण होऊन दुर्गसंवर्धन चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या विद्यापीठस्तरीय दुर्ग संवर्धन कार्यशाळेबद्दल सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, संस्थेच्या लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रुकसाना पिंजारी, एस.के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. अंजली चातीर्टन, निवृत्ती बाबाजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, सिंहगड पब्लिक प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले. तसेच संस्थेने या कार्यशाळे साठी आर्थिक सहकार्य आणि वाहतूक सुविधा देखील उपलब्ध करून कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

इतर बातम्या