Breaking news

अभिष्टचिंतन सोहळा । ज्ञानेश्वर गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्रामच्या मुलांना खाऊ व साहित्य वाटप

लोणावळा : कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजे येथील संपर्क बालग्राम संस्थेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

    यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय भाऊ गुंड, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, भाजपाच्या मावळ महिला अध्यक्षा सायली बोत्रे, भाजपा प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे, भाजे गावचे सरपंच चेतन मानकर, कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी, किसन गुंड यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व ज्ञानेश्वर गुंड मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. बालग्राम मधील मुलांच्या सोबत केक कापत गुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

     रात्री कुसगाव गावात भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळसकर, रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विनोद साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, युवक अध्यक्ष शुभम मानकामे, सरपंच अश्विनी गुंड, अमोल भेगडे, किसन येवले यांच्यासह कुसगाव व नाणे मावळातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व कुसगाव ग्रामस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रविंद्र भेगडे यांनी ज्ञानेश्वर गुंड यांच्या कार्यपद्धती स्तुतिसुमने उधळत आगामी काळात तालुकास्तरावरील कामात सक्रिय व्हा असे स‍ांगितले. तर आशिष ठोंबरे म्हणाले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गुंड व सर्व टिम उत्तम काम करत कुसगाव ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत आहेत. किसन गुंड यांनी या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

इतर बातम्या