Breaking news

कार्ला गावातील दिनेश जाधव यांना चर्मकार समाजाच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

लोणावळा : कार्ला गावातील दिनेश धोंडीबा जाधव यांना सकल चर्मकार समाजाच्या वतीने अहमदनगर येथे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. 1 मे रोजी लिडकॉम ला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सकल चर्मकार समाज या सामाजिक परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील समाज बंधू भगिनी यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिनेश जाधव हे चर्मकार संघाचे प्रदेश पातळीवर काम करत असून त्यांनी समजसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी चर्मकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या