प्रतिभा कॉलेज च्या सायबर क्राईम वॉरिअरस ने घेतले आयपीएस सत्यसाई कार्तिक व सीआयडी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

लोणावळा : प्रतिभा कॉलेज चे विद्यार्थी लोणावळा शहरात सायबर गुन्हा विषयक जनजागृती करत आहेत. क्वीक हिल कंपनीच्या माध्यमातून सायबर गुन्हे व त्यापासून लोकांनी सावधानी कशी बाळगावी या करिता ही जनजागृती केली जात आहे. सध्या इंटरनेट च्या जगात सर्व ऑनलाइन झाले आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.
मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा
या विषयी पोलीस अधिकाऱ्याना यांचा जास्त अनुभव असून त्यांच्याकडे असे विविध फसवणुकीचे गुन्हे नोंद होतं असतात. या मोहिमेत प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थीनीने पोलीस अधिकाऱ्याना भेटून त्यांच्या कडून अधिक माहिती जाणून घेतली. पुढील सायबर विषयक जनजागृती करिता अनुभव घेतले. लोणावळा पोलीस उपाधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक तसेच लोणावळा ग्रामीण चे निरीक्षक किशोर धुमाळ, सायबर क्राईम लोणावळा ब्रांच अधिकारी श्रीधर तसेच सायबर गुन्हे विभागाचे अधिकारी व पुणे येथील सीआयडी विभागातील अधिकारी सुनील बनसोडे यांच्याशी वार्तालाप करून त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रतिभा कॉलेज चे सायबर वॉरियर्स प्रेसीडेंट दिपु सिंग, पी आर संचालक बतुल परावाला, मानसी वाडेकर, श्रावणी सावंत, जोश्वा रिबेरो, आकाश ठाकूर, सानिका चोरघे यांनी ही भेट घेत माहिती घेतली.