Breaking news

महाराष्ट्रातील 11 जिल्हे वगळता उर्वरित राज्यात कोरोना निर्बंध झाले शिथिल; पुणे जिल्ह्यात मात्र निर्बंध कायम

मुंबई : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 11 जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याची घोषणा आज सोमवारी (2 आँगस्ट) रोजी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. 

    राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. मात्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या 11 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. तसेच मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे या ठिकाणी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थान अधिकारी यांनी निर्णय घ्यायचे आहेत. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये आता सर्व दुकाने, शाॅपिंग माॅल व आस्थापना रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी आस्थापना दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र निर्बंध कायम असणार आहेत. तसेच सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी नसणार आहे.

इतर बातम्या