Breaking news

Expressway Car Burning : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धावती कार जळून खाक

कार जळून खाक - व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याने कार जळून (Burning Car) खाक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार मध्ये चारजण होते.

कार जळून खाक - व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

     मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) किमी 13 जवळ पुणे लेनवर ही दुर्घटना घडली. कार क्र. (MH 43 AJ 3192) ही पुणे लेनवरून जात असताना, कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्याची माहिती समजताच कार शोल्डर लेनवे घेत कारमधील चार प्रवासी तात्काळ खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र कार पुर्णतः जळून खाक झाली आहे. कार पेटल्याची माहिती समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी कार विझवण्याचा प्रयत्न केला. 

इतर बातम्या