येळसे गावात तलाठी कार्यालयाचा शुभारंभ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

पवनानगर (प्रतिनिधी) : येळसे गावात तलाठी कार्यालयाचा शुभारंभ श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर व माजी सरपंच विजय ठाकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
स्वतंत्र्यापासुन गावात तलाठी कार्यालय नसल्याने गावातील शेतकऱ्यांचे कागदपत्राचे काम करण्यासाठी गैरसोय होत होती. शेतकऱ्यांना शेतीच्या कागदपत्रासाठी सहा ते सात किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून व आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने 20 लक्ष 38 हजार चा निधी खर्च करून येळसे तलाठी कार्यालय बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी श्री संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर, माजी सरपंच विजय ठाकर, राष्ट्रवादी माजी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, सदस्या विमल कालेकर, माजी उपसरपंच सुरेश कालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर, शिक्षक पतसंस्था संचालक नितीन वाघमारे, माऊली आढाव, राजेश राऊत, मावळ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, सुभाष कडू, रामदास कदम, अमित ठाकर, विक्रम ठाकर, राजु सुतार, दशरथ ठाकर, मारुती कालेकर, सुरेश कालेकर, भगवान शिंदे यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.