सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथील आर्थकुमार सिंग यांची इलिएशन मध्ये निवड
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा कॅम्पसच्या Training and Placement Cell च्या माध्यमातून आयोजित आजच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील आर्थकुमार सिंग, बॅच 2027, याची ELEATION या कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला ₹9.6 लाख वार्षिक पॅकेज (CTC) मिळाले आहे. ELEATION ही अभियांत्रिकी क्षेत्रातील CAD, CAE आणि Engineering Simulation प्रशिक्षण व सेवा देणारी संस्था आहे. कंपनी CREO, ANSYS आणि HyperWorks यांसारख्या तंत्रज्ञानांमध्ये प्रशिक्षण, प्रात्यक्षिक प्रकल्प, इंटर्नशिप आणि करिअर-केंद्रित कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देते. तसेच CAD-CAE आधारित अभियांत्रिकी सेवा आणि औद्योगिक समस्यांवरील Simulation Solutions देण्याचेही कार्य करते.
या उल्लेखनीय यशाबद्दल आर्थकुमार सिंग याचे Training and Placement Cell तसेच SIT लोणावळा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्याच्या या यशामुळे संस्थेच्या प्लेसमेंट कामगिरीत आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला आहे. आर्थकुमार सिंग यांच्या या यशाबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले-अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रमुख प्रा. मयूर राऊत व कर्मचारी यांनी आर्थकुमार सिंग याचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल आणि यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

















