Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट्स लोणावळा येथे स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2026 अंतर्गत फेरीचे आयोजन

लोणावळा : इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) २०२६ या उपक्रमांतर्गत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा संकुलातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा आणि एसकेएन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SKN SITS), लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने Smart India Hackathon 2026 – Internal Round उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.

      या अंतर्गत फेरीत लोणावळा संकुलातील दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्पर्धेत एकूण 35 संघांमधील 198 विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक उपाय आणि प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांमधून एकूण 33 संघांची पुढील स्तरासाठी नामनिर्देशन करण्यात आले. या उल्लेखनीय सहभागातून विद्यार्थ्यांची नवोपक्रमशीलता, तांत्रिक क्षमता, सांघिक कार्य आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये अधोरेखित झाली.

      या अंतर्गत फेरीमध्ये विद्यार्थ्यांना समाज आणि उद्योग क्षेत्रातील विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करून सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, तांत्रिक ज्ञानाचा, संशोधनात्मक दृष्टिकोनाचा आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा प्रभावी वापर करून विविध प्रकल्प व सादरीकरणे सादर केली.

      Smart India Hackathon 2026 च्या Internal Round साठी SIT, लोणावळा येथील Institute SPOC म्हणून संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता (Dean – Research & Development) डॉ. एम. एस. चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

        तसेच SIT, लोणावळा येथील विद्यार्थी समन्वयक धिषण जॉन सिद्धापूर यांनी विद्यार्थ्यांमधील समन्वय तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सक्रिय योगदान दिले.

SKN Sinhgad Institute of Technology & Science, लोणावळा यांच्यासाठी Institute SPOC म्हणून प्रा. अश्विनी सावंत यांनी मार्गदर्शन केले, तर विद्यार्थी समन्वयक सुशांत इंगळे यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

       या अंतर्गत फेरीत विविध विद्यार्थी संघांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक उपायांचे PPT सादरीकरण केले. सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांचे परीक्षण तांत्रिक संकल्पना, नाविन्यपूर्णता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची शक्यता या महत्त्वपूर्ण निकषांवर करण्यात आले.

यावेळी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड, STES लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, SKN SITS चे प्राचार्य के. पी. पाटील, तसेच दोन्ही संस्थांचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

      या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन, सांघिक कार्य, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांसारख्या महत्त्वपूर्ण कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तंत्रज्ञानाधारित नवोपक्रम विकसित करण्याची प्रेरणा निर्माण झाली. Smart India Hackathon 2026 च्या या अंतर्गत फेरीमुळे लोणावळा संकुलातील विद्यार्थ्यांच्या संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक क्षमतांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, राष्ट्रीय स्तरावरील पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

इतर बातम्या