Breaking news

अभिमानास्पद l सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळ्याचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री यांना एकलव्य फाउंडेशन तर्फे ‘गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार’

पुणे | प्रतिनिधी : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण योगदानाबद्दल एकलव्य फाउंडेशन तर्फे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘एकलव्य शिक्षक गौरव सोहळा 2026’ या विशेष कार्यक्रमात ‘गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

शिक्षणाच्या यज्ञकुंडात आपल्या ज्ञानाची आणि प्रतिभेची समिधा अर्पण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची डॉ. मंत्री यांची प्रेरणादायी वाटचाल अनेकांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. त्यांची कार्याप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, समर्पणभाव आणि शिक्षणाबद्दलची उत्कटता त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची साक्ष देते. विद्यार्थ्यांना ज्ञान देत अनेक पिढ्या घडविताना त्यांनी आदर्श शिक्षणाची जी वाट निर्माण केली आहे, ती आज अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यासाठी त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

STES चे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. डी. एस. मंत्री यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या