Breaking news

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर तर कार्याध्यक्षपदी रेखा भेगडे

वडगाव मावळ : क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी (९ ऑगस्ट) वडगाव मावळ येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. लोकमतचे वार्ताहर सचिन गोविंद ठाकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी, तर सतर्क महाराष्ट्र संपादिका रेखा भेगडे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विजय सुराणा, जेष्ठ पत्रकार ॲड. संजय पाटील, श्रीराम कुमठेकर, राजेंद्र काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून मावळच्या जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रा. योगेश घोडके व मनोज दत्तात्रय गवळी यांची निवड तसेच खजिनदारपदी संतोष थिटे, पत्रकार परिषद प्रमुखपदी सुभाष भांडे यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागारपदी ॲड. संजय पाटील, ॲड. प्रफुल्ल सोनवणे तर प्रकल्प प्रमुखपदी दत्ता म्हाळसकर व गणेश वायकर यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीचा ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय सुराणा, प्रा. महादेव वाघमारे, सचिन गोविंद ठाकर, सुभाष भांडे, मनोज मोरे, धनंजय नांगरे, अमीन खान, रेखा भेगडे, ॲड. संजय पाटील, योगेश घोडके मयूर सातपुते, महेंद्र ओव्हाळ, ॲड. प्रफुल्ल सोनवणे, संतोष थिटे, सचिन मोरे, सचिन चिपळगावकर, दत्ता म्हाळसकर, चंद्रकांत जोशी, रियाज शेख, दीपाली पारसकर, श्रीराम कुमठेकर, ॲड. निलेश अग्रवाल, गणेश वायकर, शिल्पा येवले, मनोज गवळी, रश्मी शिरस्कर, सुनील म्हस्के, रितेश भोमे, बापू बी. पाटील, शकिल बागवान, गणेश भेगडे, अनिष शेख, सुनील आढाव, राजेंद्र काळोखे आदी पत्रकार उपस्थित होते.

इतर बातम्या

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने दरडग्रस्तांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला मंत्री महाजनांच्या तातडीच्या सूचना