Breaking news

शिवली गावच्या आदर्श सरपंच माधुरी आडकर यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान

मावळ माझा न्युज नेटवर्क : शिवली ग्रामपंचायत आदर्श आणि कार्यक्षम सरपंच माधुरी संदीप आडकर पाटील यांना नुकताच सामाजिक कार्याबद्दल राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सोलापूर येथे गौरवण्यात आले. माधुरी आडकर या शिक्षिका आहेत. आपला शिक्षिकी पेशा सांभाळत त्यांनी राजकारणामध्ये आधार पण केले व गावच्या सरपंच झाल्या आहेत. सरपंच म्हणून काम करत असताना गावामध्ये सुमारे साडेतीन कोटी रुपयांची विकास कामे आत्तापर्यंत केली आहे. त्यांचे पती संदीप आडकर हे देखील शिक्षक असून सोबतच गावचे पाटील पद देखील सांभाळत आहे.

     शिक्षकी पेशा सांभाळत असताना या दांपत्याने गावातील महत्त्वाची दोन्ही पदे भूषवली आहेत. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत विकास कामांचा देखील आलेख उंचावत ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना नुकताच राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले आहे.

इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप