लोणावळा भागातील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश; लोणावळ्यात महायुतीची आढावा बैठक
लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A ), रासप, मनसे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी सुमित्रा हॉल भांगरवाडी येथे महायुतीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी लोणावळा शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी व महिलांनी श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत व शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने उभाठा चे मा. विभागप्रमुख विशाल पाठारे, मा शाखाप्रमुख नरेश घोलप, उद्योजक नंदुभाऊ कडू, संजय पडवळ, संतोष शिंत्रे, अशोक गाडे, बाळासाहेब सकट, राकेश सकट यांनी पक्षप्रवेश केला. तसेच मनीषा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली प्रिया पाटेकर, पद्मजा पूलरवार, आयेशा शेख समवेत हनुमान टेकडी भागातील 20 महिलांनी आणि राजूभाऊ चव्हाण व दिलीप दुबे यांच्या नेतृत्वाखाली 30 उत्तर भारतीय बांधवानी, युवासेना शहराधिकारी विवेक भांगरे, उपशहर अधिकारी आतिष भांगरे यांच्या नेतृत्वाखाली 20 युवकांनी अशा एकूण 80 जणांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर यांनी दिली.
या बैठकीला आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊ गुंड, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष विलास बडेकर, भाजपा शहर अध्यक्ष अरुण लाड, मा नगराध्यक्ष अमित गवळी, आरपीआय शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, राम सावंत, सुनील हगवणे, जीवन गायकवाड, भरत टकले, भरत हारपुडे, देविदास कडू, बाळासाहेब जाधव, मंदाताई सोनवणे, संजय गायकवाड, अंजलीताई कडू, बिंद्रा गणांत्रा, दिपाली गवळी, अर्जुन पाठारे, अभय पारख, हर्षल होगले, निखिल सोमण, सुधाताई सोमण, प्रमोद लोहिरे, प्रमोद फाटे, चंद्रकांत भंडारी, ललित कदम, राजश्री गायकवाड, जाकीर खलिफा, विजया वाळंज, अमोल ओम्बळे, जयप्रकाश परदेशी, कमलेश सैगर, प्रकाश हारपुडे पाटील, नवनाथ हारपुडे, पराग राणे, आदित्य पंचमुख, समीर खोले, आशिष बुटाला, समीर इंगळे, अशोक सरावते, परेश वावळे, सुनील हारपुडे,गोपाळ हारपुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लोणावळा खंडाळा शहरातील अनेक विविध सामाजिक संघटना, सहकारी संस्था, धार्मिक स्थळ, मंडळे, आजी माजी नगरसेवक, महिला बचत गट व सामाजिक कार्यकर्ते व मतदारांशी गाठी भेटी घेत थेट संवाद साधला यावेळी महायुती चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.