Breaking news

लोणावळा शहर व ग्रामीण भागात अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या तीन हॉटेलांवर कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागात अवैद्यरित्या हुक्का पार्लर चालवणाऱ्या तीन हॉटेल व्यवसायिकांवर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने कारवाई करत 93 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    या प्रकरणी सरकारी फिर्याद दाखल करण्यात आली असून लोणावळा शहरातील हॉटेल युटोपिया, हॉटेल कुमार रिसॉर्ट व ग्रामीण भागातील हॉटेल बैठक या तीन ठिकाणी ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली आहे.

     लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक म्हणाले, संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा उपविभाग कार्यालय हद्दीमध्ये सर्व नागरिकांना व आस्थापनांना वारंवार आवाहन करून देखील काही ठिकाणी अवैधरित्या अंमली पदार्थ, हुक्का, बेकायदेशीर दारू विक्री असे प्रकार सुरू आहेत. लोणावळा शहर हद्दीमधील हॉटेल युटोपिया व हॉटेल कुमार रिसॉर्ट तसेच ग्रामीण भागातील हॉटेल बैठक या ठिकाणी ग्राहकांना अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करून काल रात्री उशिरा या तीनही ठिकाणी कारवाई केली असता तीनही ठिकाणी ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिल्याचे मिळून आले आहे. सदर ठिकाणी हुक्क्यासाठी लागणारे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप असा 93 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

      रुस्तम वकील अहमद (वय 20 वर्ष), रोशन मनोज यादव (वय 30 वर्ष), कृष्णा नाथा राठोड (वय 31 वर्ष तिघेही राहणार लोणावळा), प्रताप कृष्णा डिंबळे (वय 42 वर्ष राहणार कार्ला), बिपीन्छु मार परमेश्वर महतो (वय 30 वर्षे, रा. उल्हासनगर, ठाणे) यांच्या विरोधात याप्रकरणी सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस नाईक सचिन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येळवंडे, काळे, टकले, माळवे, पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल चवरे व शिंदे यांच्या पथकाने केली.


इतर बातम्या