Breaking news

Lonavala Crime News : लोणावळ्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग; आरोपीला अटक

लोणावळा : दुचाकी गाडीवरुन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका युवतीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (20 मे) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आरोपीला आज लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

     लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक 20 वर्षीय युवती शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास रायवुड विभागातील आँक्झिलियम शाळेच्या जवळून घरी जात असताना मागून दुचाकी गाडीवर आलेला तरुण वैभव साठे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने मी कुरवंडे गावाकडे चाललो आहे. तुला तिकडे सोडता असे सांगत दुचाकीवर बसविले. पुढे निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या भट्टी यांच्या बंगल्याच्या जवळ गाडी थांबवत तीच्या एकटेपणाचा फायदा घेत तीच्याशी बोलण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न करु लागला, तसेच हात पकडून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

   लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सदर मुलीच्या फिर्यादीवरून हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पोलीस कर्मचारी हनुमंत शिंदे, मनोज मोरे, राजेंद्र मदने यांच्या पथकाने मुलींने वर्णन केलेले व नाव सांगितलेल्या मुलांचा शोध घेत त्याला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

इतर बातम्या