Breaking news

Talegaon News l तळेगाव शहरात भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यात तरुणाचा खून

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरात किरकोळ वादातून शुक्रवारी (दि. 31 जानेवारी) दुपारी एका तरुणाचा खून (Talegaon Murder) करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

      आर्यन बेडेकर (वय 19, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत आर्यन आणि संशयित यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी आर्यनवर कोयता व धारदार शस्त्राने वार केले, अशी माहिती पुढे येत आहे.

     तळेगाव स्टेशन येथील सिद्धार्थ नगर येथील एका तरुणावर शनिवारी दुपारी चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.

इतर बातम्या