Breaking news

Lonavala Crime News : 85 किलो वजनाची कॉपर वायर चोरणारा चोरटा गजाआड

लोणावळा : टाटा पॉवर येथून 85 किलो वजनाची कॉपर वायर चोरणारा चोरटा पोलिसांनी पकडला असून त्याला वडगाव न्यायालयाने 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

    रविवारी लोणावळ्यातील टाटा पॉवर येथून मुन्ना सादिक शेख (वय 30 वर्ष रा. कैलासनगर लोणावळा) याने रेल्वे पटरीने पायी चालत जावून एकूण 85 किलो वजनाची 85,000/- रुपये किंमतीची कॉपर वायर चोरी केली होती. सदर आरोपीला ताब्यात घेवून त्यांचे कडून सदरची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.

    सदरचा गुन्हा हा लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सपोनि राहूल लाड, पो. हवालदार हनुमत शिंदे, पो. हवालदार संदिप घोटकर पोलीस नाईक मानकर, पो.कॉ मुलाणी, विकास कदम, होमगार्ड सोमनाथ बोडके यांनी उघडकीस आणला आहे.

इतर बातम्या