Breaking news

संपर्क भांबर्डे संस्थेला स्कूल बस भेट; अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

लोणावळा : संपर्क बालग्राम संस्था भांबर्डे यांना नुकतीच एक स्कूल बस भेट देण्यात आल्याने भांबर्डे या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. गुरुवारी (14 मार्च 2024) नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून संपर्क संस्थेच्या संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका मुळशी या शाळेला शालेय विद्यार्थ्यांसाठी सदरची स्कूल बस अर्पण करण्यात आली.

       या स्कूल बस मुळे भांबर्डे परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील विद्यार्थ्यांची पायपीट आता थांबणार आहे. नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉल व शाळा इमारती वरील पत्रे देखील बदलण्यात आले असून वस्तीगृहातील निवासी असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक लॉकर्स कपाट देण्यात आले आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्पातील सर्व महिला कर्मचारी व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत पाहुण्यांची मने जिंकली.

       या कार्यक्रमासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शिशिर बैजल व साधना बैजल, संस्थापक, सचिव संपर्क संस्था अमित कुमार बॅनर्जी, संपर्क संस्थेचे सीईओ अनुज कुमार सिंग, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ह्युमन रिसोर्स निशिध उपाध्याय, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, नवनिता चटर्जी, सतीश माळी, उपसरपंच दत्ता दिघे, ग्रामसेवक नितीन डुके, एकनाथ दिघे, गोविंद सरूसे, जयराम दिघे, श्रीराम वायकर, विनायक कोकरे, संतोष गोरे, तानाजी दिघे, अंकुश दहिभाते, किसन दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भांबर्डे, गोठे, आडगाव, आहिरवाडी, तैलबैल, कदम बारपे इत्यादी धरणग्रस्त भागातील पालक मंडळी व नाईट फ्रैंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उच्चस्त पदाधिकारी, संस्थेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना कंपनीचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी संपर्क संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या आदिवासी मुलांसाठीच्या कामाचे कौतुक केले. तसेच संपर्क संस्थेच्या या कार्यात कंपनी भविष्यात देखील मदत करेल असे आश्वासन दिले. सर्व मान्यवरांचे स्वागत अमित कुमार बॅनर्जी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय चाळक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक रफिक पठाण यांनी केले सहाय्यक प्रकल्प अधिकारी हिरामण कोकणे यांनी सर्वांचे आभार मानले.

इतर बातम्या