Breaking news

तळेगाव दाभाडे येथे निवृत्त नर्सची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा : तळेगाव दाभाडे येथील पंचवटी काॅलनी मध्ये राहणार्‍या निवृत्त नर्स यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी घडली. 

    भारती दत्तू हिंगणे/सोनवणे (वय 56) असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ह्या तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स होत्या. त्या सेवा निवृत्त झाल्या होत्या. राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून तळेगाव दाभाडे पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत. 

इतर बातम्या