Breaking news

Lonavala Crime News : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

लोणावळा : अल्पवयीन मुलीला फुस लावत तीला पळवून नेत विनयभंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात रात्री एकावर गुन्हा दाखल करत, त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

    अहमद मोहम्मद रफी शेख (रा. मानकुर्द करबला मैदानाजवळ चिताह कॅम्प, मुंबई) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लोणावळ्यातील एका अल्पवयीन मुलीला एका युवकाने पळवून नेहली असल्याची पोस्ट काल सायंकाळनंतर सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्या अनुषंगाने हिंदू समिती सदस्य, रायवुड भागातील युवा कार्यकर्ते व पोलीस शोध घेत असताना, रायवुड भागात सदरचा आरोपी त्या अल्पवयीन मुलीसह मिळून आला. त्याला स्थानिकांनी पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख याच्यावर रात्री उशिरा भादंवी कलम 363, 354, 354 (अ),पोस्को 8,12 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे ह्या करत आहेत.

इतर बातम्या